मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2.0
राज्यातील शेतकऱ्यांना माफक दरात व त्यांच्या सोयीनुसार दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, या दृष्टिकोनातून ज्या ग्रामीण भागामध्ये गावठाण व कृषी वीज वाहिनीचे विलगीकरण झाले आहे, अशा ठिकाणी कृषी वीज वाहिनीचे सौर उर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासाठी दिनांक १४ जून, २०१७ च्या शासन निर्णयान्वये “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना” सुरू करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी या योजनेतील अडचणी दूर करून अंमलबजावणी मिशन मोडमध्ये करण्याच्या दृष्टीने दिनांक ०८.०५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०-अन्वये मान्यता देण्यात आली आहे.
सदर अभियानांतर्गत सन २०२५ पर्यंत सुमारे ७००० मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. शासन निर्णय दि १३.०९.२०२४ अन्वये या MSKVY २.० अंतर्गत या आधी निश्चित केलेले उद्दीष्ट वाढवून १६००० मेगावॅट सौर ऊर्जा क्षमता स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शंभर टक्के कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे उद्देश साध्य होणार आहे.
लाभार्थी:
शेतकरी
फायदे:
वर सांगितल्याप्रमाणे.
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा.